Home >> About us >> Chronological Biodata>> Darara 8 April 1996
Darara 8 April 1996
वास्तुशास्त्रातला युवा किरण संजय महाशब्दे
आवाहन - युवक मित्रांनो हे सदर तुमचं आहे. हा स्तंभ तुमचाच आहे मग तुमचे विचार ह्या स्तंभातून व्यक्त व्हायला नको? मग उचला पेन अन् मांडा तुमचे विचार ! विषय कोणताही घ्या! राजकारणापासून तर ते चित्रपटापर्यंत ! तुमच्या लेखांचे, विचारांचे स्वागत आहे.
तुमच्या मुलाचे अभ्यासात लक्ष लागत नसेल, त्याची स्मरणशक्ती कमी झालेली असेल तर घरातली त्याची अभ्यासाची जागा बदलून पहा.
पूर्वी पेक्षा अभ्यासात जास्त लक्ष देतोय असं तुम्हाला जाणवेल त्याची स्मरणशक्ती हळूहळू वाढतेय असं तुम्हाला दिसू लागेल.
तुमच्या घरातल्या एखाद्या व्यक्तीला असाध्य रोग झालाय. अनेक वैद्यकिय उपाय करून तुम्ही थकलात. तेव्हा तुम्ही त्याच्या झोपण्याची जागा बदलून पहा. त्याचा आजर हळूहळू बरा होतोय असे तुम्हाला जाणवू लागेल.
तुमच्या घरावर सतत संकट येताहेत. येणार्या संकटांनी तुम्ही त्रस्त झाला आहोत तुम्ही तुमच्या घराच्या भिंतीचा रंग बदलून पहा. संकटाची तीव्रता कमी झालेली तुम्हाला जाणवेल.
तुमचा विश्वास बसतोय ह्या सर्व गोष्टीवर
पण मित्रांनो! हे सर्व खरं असल्याचा दावा करतोय अकोल्यातला एक युवा वास्तुशास्त्रज्ञ नुसताच दावा नव्हे तर पुराव्यानिशी सिद्ध करतोय हा युवा वास्तुशास्त्रज्ञ कोण आहे हा युवा वास्तु शास्त्रज्ञ? मी सांगतो.
संजय भास्करराव महाशब्दे
विश्वेश्वराच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी.आर्च ही पदवी घेतल्यानंतर हा युवक सरकारी नोकरीत न गुरफटता स्वतंत्र व्यवसायात उतरला.
नोकरीच्या अनेक संधी चालून आलेल्या असतानांही हा संजय स्वतंत्र व्यवसायात अधिक रमला. ह्या बाबात मी म्हणतो ‘व्यवसायात निर्णय घेता येतात. त्या निर्णयावर केवळ आपलाच हक्क असतो. इतर नोकरी करतांना तसे होत नाही. व्यवसायात धोका पत्करावा लागतो पण काम करतांना खूप समाधान लाभते.
सर्वसाधारण युवक बी. आर्च ही पदवी घेतल्यानंतर घराचे, बिल्डिंगचे ड्रॉईंग किंवा नकाशे काढण्यात स्वत:ला गुंतवून घेतो. पण ह्या संजयने स्वत:ला कशात गुंतवले माहित आहे? शिवकालीन किल्ल्यांचे वास्तूशास्त्र कसे होते हे पाहण्यात ! तो अनेक किल्ले फिरला, त्या किल्ल्यांच्या अनेक रचना पाहिल्या. यावर तो म्हणतो की मुंबईतल्या १०० वर्षापूर्वीच्या इमारती धडाधड कोसळत आहेत. पण हजारों वर्षापूर्वी बांधलेल्या किल्ल्यांची स्थिती आजही भक्कम आहे. असे का? आज एखाद्या हॉलमध्ये बोलतांना आपल्याला माईकची गरज लागते. त्याकाळी रायगडावर दरबारात सिंहासनावर बसलेल्या शिवाजींच्या आवाज प्रशस्त दरबारातल्या कोपर्यातल्या माणसालाही स्पष्ट ऐकू यायचा असे का? आज पहिल्या मजल्यावर पाणी न्यायला आपल्याला पंपाची गरज लागते. त्याकाळी ही कोणतीही साधन सामुग्री नसतांना किल्ल्यांवर पाणी चढत होते. हे कसे?
ह्या सर्व प्रश्नांचा अभ्यास करून संजय म्हणतो की त्या काळचे वास्तुशास्त्रज्ञ आजच्या पेक्षा निश्चितच श्रेष्ठ दर्जाचे होते. त्या काळच्या वास्तूची रचना, भिंतीची जाडी, दांर-खिडक्यांची जागा, हवा, प्रकाश, छताची ठेवण, ह्या सर्व गोष्टींचा अत्यंत बारकाईने अभ्यास वास्तूशास्त्रज्ञ तेव्हा करत होते आणि म्हणूनच त्याकाळच्या वास्तू आजही आपल्याला दिमाखात उभ्या असतांना दिसतात.
किल्ल्यांच्या वास्तुशास्त्रावर अतिशय सखोल अभ्यास करून अनेक गोष्टी संजयने लोकांसमोर उलगडून दाखवल्या. पुणे-मुंबईच्या जनतेसमोर ह्या विषयावर भाषण दिले आणि बाबासाहेब पुरंदरेसारख्या व्यक्तीकडून दाद मिळवली.
सध्या संजय एका वेगळ्याच विषयाचा अभ्यास करतोय!
इमारतींचा चुकीचा आकार किंवा बांधकामाची चुकीची पद्धती यांचा वास्तु वापरणार्या व्यक्तीच्या मानसिकता किंवा शारीरिकता यावर विपरीत परिणाम कसा होतो हे तो शोधतोय. या बाबत तो म्हणतो की ‘‘निसर्गात सर्वत्र उर्जा भरून राहिली आहे आणि केवळ उर्जेमुळेच जीवनचक्र सुरू आहे. ह्याच उर्जेमुळे आपल्या शरीरात रक्त प्रवाह सुरू असतो. रासायनिक उर्जा, विद्युत उर्जा, यात्रिक उर्जा, चुंबकीय उर्जा असे उर्जेचे अनेक प्रकार आहेत. या उर्जा किरणांचा, उर्जा क्षेत्राचा आपण बांधत असलेल्या वास्तुवर आणि तो वास्तु वापरणार्या शरीरांवर परिणाम होत असतो. परंतु ही बाब आजचे वास्तुशास्त्रात वास्तू बांधताना गृहीत धरत नाही.
मुंग्याची वारूळं ही निगेटिव्ह उर्जा केंद्रावर निदर्शनास आली आहे. घरातली मांजर ही एका विशिष्ट ठिकाणी विसावतांना दिसते. ती जागा अत्यंत निगेटिव्ह उर्जा केंद्राची जागा असते. कुत्रा, गाय, घोडा हे प्राणी ज्या ठिकाणी स्वत:हून वास्तव्य करतात त्या जागा न्युट्रल अथवा पॉझिटिव्ह असल्याने आढळून आले आहे आणि अशा जागा माणसाला राहण्यायोग्य असल्याचे सिद्ध झाले आहे.
खरं म्हणजे वास्तु रचना करतांना वास्तु मालकाच्या गरजांचे अभ्यास अधिकप्रमाणात केला जातो. परंतु वास्तुशास्त्रानुसार ग्रह, नक्षत्र, पृथ्वीवरील उर्जा, ह्यांचा वास्तु उपभोगण्यावर काय परिणाम होईल ह्याचा अभ्यास होत नाही.’’
‘‘उर्जा शुद्ध वास्तुची निर्मीती ही खरी आजची गरज आहे. परंतु त्यासाठी नवीन वैशिष्ट्यपूर्ण कौशल्याची आवश्यकता असते. निसर्ग, वास्तू आणि शरीर यामधील उर्जा संतुलन वास्तू शास्त्राच्या माध्यमातून साधण्याची कला वास्तू उभी करतांना उपयोगात आणायला पाहिजे.’’मित्रानो, आश्चर्य हेच की अशा अदृश्य किरणांचा, उर्जेचा, समतोल साधण्याचे यंत्र संजयने शोधून काढले आहे. व हे यंत्र अकोला येथे उपलब्ध आहे. तुम्हाला हे यंत्र पाहायचं आहे? तुम्हाला ही उर्जा, त्याचे परिणाम ह्याबद्दल काही शंका आहे? किंवा
किल्ल्याच्या वास्तुरचनेबद्दल तुम्हाला काही विचारायचं आहे?
तर-
तुम्ही बेधडक घरी जा. दारावरची घंटी वाजवा. हा संजय महाशब्दे तुमचे हसत मुखाने स्वागत करतांना तुम्हाला दिसेल.