Vaidic Sanskar-vastu tadnya,Vastu compliant Home,Vastu compliant Office,vastu consultant,interior vastu way,vastu compliant property,vastu energies,vastu shastra training,ENERGY BASE BRANDING

Grah Dhoop

The Grah Dhoop sticks are made from natural, sustainable planet sources.

Dikpal

Dikpal means a Protector of Direction.


Vaastu Nikshep Manjusha

Indian tradition deals in detail with Vaastu Shanti, a process of energization.

Auspiwatch

This is not just the watch, it is almost the map of the planet movement everyday

Orgone Energy Products

Dr. Wilhel Reich, M. D. of USA is just one of them who named it as 'orgone energy'.

Vaastu Consultancy

Our services include Vaastu Consultancy for Residential, Commercial, Industrial, Residential cum Commercial

Vaastu Solutions

Vastu-compliant-Office
Energy Based Branding

Are you looking out for strategic and scientific solutions for the growth of your business? 'Energy Based Branding' is the answer. Experience to Believe it!

Home >> About us >> Chronological Biodata>> Deshonati 28 July 1994

Deshonati 28 July 1994

वैश्विक कीरण आणि वास्तू-शास्त्र

मनुष्याला तो राहत असलेल्या अथवा राहणार असलेल्या घरामध्ये, सुर्यादि ग्रहांच्या वैश्‍विक किरणांचा, पृथ्वीच्या भु-विद्युत -चुंबकीय किरणांचा तसेच विविध उर्जाकिरणांचा जास्तीत जास्त फायदा आणि उपयोग व्हावा. शारीरिक, मानसिक आणि पर्यायाने आध्यात्मिकदृष्ट्या हानीकारक परिणाम टाळता यावेत या हेतूने वास्तु-शास्त्र अस्तित्वात आले.

अनेकदा केवळ आजच्या तथाकथीत वैज्ञानिक कल्पनांच्या चौकटीत बसत नसल्याच्या आरोपामुळे पारंपारिक शास्त्रांना डावलण्यात येते. परंतु कोणत्याही अशास्त्रीय कल्पना हजारो वर्षासाठी कोणत्याही समाजात रूढीबद्ध होऊ शकत नाहीत. उपलब्ध असलेली प्राचीन वास्तु शास्त्रांवरील ग्रंथ संपदा तसेच त्यातील वर्णनांनुसार बांधण्यात आलेल्या शेकडो, हजारो वर्षापूर्वी निर्मिलेल्या देशभर पसरलेल्या अनेक इमारतींच्या प्रत्येक अवशेषातच तत्कालीन वास्तु - शास्त्रीय संकल्पनांच्या परिपूर्णतेची साक्ष पटते.

दुर्दैवाने सध्या प्रचलीत असलेल्या वास्तु-शात्रीय प्रवाहात या उर्जा किरणांचा, उर्जा क्षेत्रांचा आणि त्या उर्जा किरणांच्या पृथ्वी वरील जाळ्यांचा वास्तुंवर आणि वास्तुंचा उपभोग घेणार्‍यांच्या शरीरावर होणाऱ्या परिणामांची, आजकालचे वास्तुतज्ञ कोणत्याही प्रकारची दखल घेताना दिसत नाहीत, असे म्हणने धाडसाचे असले तरीही गैर ठरणार नाही. वास्तु-शास्त्र संबंधिच्या पाश्‍चिमात्यांच्या जडवादी विचारशैलीमध्ये दिशाहिनतेने प्रवाहपतीत होत चाललेल्या विद्वान भारतीय वास्तुतज्ञांनी केवळ भारतीय अनुभवातून प्रगल्भ झालेले, भारतीय समाजाला सुयोग्य असलेले आणि भारतीय निसर्गचक्रानुसार अनुरूप असलेले, परिपूर्ण भारतीय वास्तु-शास्त्र समजून उमजून भारतीय समाजासाठी प्रसारात आणले पाहिजेत.

आपल्या आसपास अनेक घटना घडत असतात, वेगवान वारे वहात असतात, रस्त्यांवर विविध वाहने फिरत असतात आणि आपल्या शरीरातही अनेक घटना घडत असतात. ही अक्षरे वाचतांना आपले डोळे हलत असतात तसेच संपूर्ण शरीरात रक्त प्रवाह देखील सुरू असतो. या सर्व घटना उर्जेमुळे घडत असतात. निसर्गात सर्वत्र उर्जा भरून राहिली आहे आणि केवळ उर्जेमुळेच संपूर्ण पृथ्वीवर आणि ब्रम्हांडात सर्वत्र अनेक प्रकारच्या घटना सतत घडत असतात. उर्जेमुळेच जीवन चक्र सुरू आहे. पृथ्वीवरील लहानात लहान जिवाणुंपासून मोठ्यात मोठ्या देव माशापार्यंत आणि सगळ्यासत उंच वृक्षा पर्यंत उर्जेचं अस्तित्व भरून राहिलेलं आहे. रासायनिक, विद्युत, यांत्रिक, औष्णिक, चुंबकिय, विद्युत-चुंबकीय असे उर्जेचे अनेक प्रकार आहेत.

अस्तित्वात बसलेला प्रत्येक पदार्थ हा सुक्ष्म कणांचा बनलेला असतो. हे कण अणुंचे बनलेले असतात आणि अणु हे विद्युत भारित परमाणुंपासून बनलेले असतात. अणुकेंद्रा भोवती हे विद्युत भारित परमाणु सतत भ्रमण करीत असतात आणि भ्रमण करणारे विद्युत भारित परमाणु सतत उर्जा प्रारणं बाहेर प्रसारित करीत असतात आणि म्हणूनच अस्तित्वात असलेला प्रत्येक पदार्थ वेगवेगळ्या नैसर्गिक फ्रिक्वेसीजची उर्जा प्रारणं सतत बाहेर टाकत असतो.

प्रकाश अर्थात डोळ्यांना जाणवणारा प्रकाश म्हणजे विद्युत चुंबकीय उर्जा लहरींच्या अस्तित्वात प्रत्यक्ष पुरावाच होय. डोळ्यांना जाणवणारा हा प्रकाश विद्युत - चुंबकीय उर्जा लहरींच्या अनेक प्रकारांपैकी ठराविक भाग होय. प्रकाशाचा रंग हा त्याच्या वेव्ह-लेंग्थ वर अवलंबून असतो. साधारणपणे वेव्ह-लेंग्थ मोजण्याचे प्रमाणे म्हणजे एका सेंटीमीटरचा एक शंभर दशलक्षांशावा भाग होय. डोळ्याला दिसणार्‍या प्रकाशाची, वेगवेगळ्या रंगांची वेव्ह-लेंग्थ ३००० ते ७२०० ऍगस्ट्रॉम इतकी असते. जर प्रकाश किरणांची वेव्ह-लेंग्थ या मर्यादेपेक्षा कमी अथवा जास्त असेल तर अशी किरणे डोळ्यांनी दिसत नाहीत. यापैकी अल्ट्रा व्हॉयोलेट, एक्स-रेज, गॅमा -रेज, तसेच इन्फ्रो-रेड, मायक्रो-वेव्ह आणि रेडियो-वेव्ह ह्या आहेत. यापैकी काहींची वेव्ह-लेंग्थ अनेक किलोमिटर्स देखील असते. या सर्व डोळ्यांना जाणवणार्‍या अथवा न जाणवणार्‍या विद्युत-चुबकीय उर्जा किरणांची फिक्वेंसी वेगवेगळी असली तरीही त्यांचा वेग मात्र एकसारखा, ३०००० कि.मी. / सेकंद हवेत तसेच अवकाशात ही असतो.

माणसाच्या शरीरातील प्रत्येक पेशी ही एका रेडिओ-रिसीव्हर आणि ट्रांस्मीटर सारखे कार्य करीत असते. शरीरातील पेशींची जास्तीतजास्त वेव्ह-लेंग्थ २२ स.मी. इतकी असून नैसर्गिक फ्रिक्वेंसी वेगवेगळी असते. शरीराबाहेरच्या उर्जा किरणांना ग्रहण करण्यासाठी शरीरातील पेशींना ७० मिली व्होल्टस इतकी उर्जा लागते. शरीरातील पेशी त्यांना आवश्यक असलेल्या बहुतेक उर्जा पृथ्वीच्या कंपनांद्वारे आणि निसर्गातून प्राप्त करून घेत असतात. कोणतीही भौतिक (जड) यंत्रणा उर्जेशिवाय कोणतेही कार्य अथवा स्वसंरक्षण, स्वसंवेदन करण्यास असमर्थ असते.

जडवादी वैज्ञानिक अशा कोणत्याही गोष्टीस मान्यता देत नाहीत जिचे अस्तित्व प्रत्यक्ष जाणवत अथवा अनुभवता येत नाही. परंतु या उर्जा विश्‍वातील उर्जेचा कोणताही प्रकार मानवी डोळ्यांनी अथवा मानव निर्मित कोणत्याही यंत्रांनी अनुभवणे अशक्य आहे. उर्जा अदृश्य असते, उर्जेचा परिणाम केवळ दृष्य असतो. उर्जा भारित वस्तुंचे चलन आणि त्यांचे सतत कार्यरत राहणे हाच उर्जेचा प्रत्यक्ष पुरावा होय आणि म्हणूनच उर्जेचे परिणाम अटळ असतात.

मानवी शरीरातही निरोगी आणि रोगी अवस्था यांचा संबंध प्रत्यक्ष मानवी शरीरातील उर्जेशीच आहे. केवळ शरीरातील उर्जा क्षेत्रातील ऐक्य/तोल बिघडल्यास किंवा उर्जा अक्ष असंतुलित झाल्यासच वेगवेगळे रोग/ व्याधी निर्माण होतात.

मानवी शरीराप्रमाणे प्रत्ये वस्तु, प्राणी वनस्पती पदार्थ आणि आकार यांचे स्वतंत्र असे उर्जाक्षेत्र, उर्जाकिरणांचे जाळे तसेच उर्जा अक्ष असतात आणि त्यांची स्वत:ची अशी नैसर्गिक फ्रिक्वेंसी आणि वेव्ह-लेंग्थ ही असते. भौतिक शास्त्रातील नियमाप्रमाणे २७३ अंश सेल्सीएस या तापमानाखेरीज इतर कोणत्याही तापमानात जगातील प्रत्येक वस्तु किरणांच्या स्वरूपांत उर्जा प्रसारीत करीत असतात. पृथ्वी वरील वेगवेगळ्या जड किरणांचा, दिशांशी आणि मानवी शरीरातील उर्जा, अक्षाशी असलेला परस्पर गूढ संबंध प्राचीन वास्तु-शास्त्राच्या अनेक तत्वांमध्ये तसेच इमारतींमध्ये आश्‍चर्यकारकतेने तंतोतंत पाळलेला दिसतो. याचा इमारतींचा उपयोग करणार्‍या माणसांच्या आरोग्य तसेच उत्कर्षाशी घनिष्ट असल्याचे सिद्ध झाले आहे.

१९७० च्या दशकात जर्मनीतील डॉ. हर्टमन यांनी लोबे-ऍन्टेना नावाच्या उपकरणाच्या सहाय्याने संपूर्ण पृथ्वीवर पसरलेल्या उत्तर-दक्षिण प्रत्येक दोन मिटर अंतरावरील आणि पूर्व-पश्‍चिम प्रत्येक अडीच मिटर अंतरावरील उर्जा किरण रेखांची माहिती जगाला करून दिली. यासंबंधी गेल्या दोन दशकात झालेल्या संशोधनाप्रमाणे अशा एकूण २० प्रकारच्या उर्जा रेषा जाळ्यांची पृथ्वीभर पसरली असल्याची माहिती देखील उपलब्ध झाली आहे.

सर्व सजीव प्राणी पृथ्वीवरील या अदृष्य भिंतींची योग्य ती दखल घेत असल्याची आश्‍चर्यकारक नोंद देखील शास्त्रज्ञांनी केलेली आहे. मुंग्यांची वारूळं देखील निगेटिव्ह उर्जा केंद्रावर निदर्शनास आली आहेत. मांजरही अत्यंत निगेटिव्ह उर्जा केंद्रावर विसावतांना आढळली आहे. हे सर्व उर्जा बिंदू माणासास हानिकारक असल्याची माहिती आहे. किंबहूना कुत्रा, गाय, शेळी, घोडा हे प्राणी ज्या जागी स्वत:हून वास्तव्य करतात त्या जागा न्युट्रल अथवा पॉझिटिव्ह असल्याचे तसेच माणसांसाठी राहण्यायोग्य असल्याचे आढळले आहे. चीन या देशातील प्राचीन वैद्यक शास्त्रज्ञांनी शरीरातील रक्तवाहिन्या, धमन्या, मज्जातंतु वगैरेमध्ये फारसा फरक केलेला आढळत नाही. त्यांनी त्यांचे लक्ष प्रामुख्याने शरीरातील उर्जा स्त्रोतांवर केंद्रीत केले ज्यांच्या आधारावर आणि त्यांच्यातील परस्पर संबंधामुळे स्वास्थ रक्षण तसेच प्रमुख कार्ये घउत होती.

याच धर्तीवर प्राचीन वास्तुशिल्पकाराने वास्तु-शास्त्रात देखील एका कुटुंबासाठी सुचविलेल्या वास्तुरचनेत वेगवेगळ्या दिशांना निरनिराळी कार्ये ठरूवन दिली होती आणि अनेक वास्तु एकत्र बांधतांना पाळावयाची निरनिराळी कार्ये ठरवून दिली होती आणि अनेक वास्तु एक़त्र बांधताना पाळावयाची बंधने अत्यंत विस्तृतपणे लिहून ठेवली आहेत. वास्तुरचना करणे हे अतिशय किचटक आणि गुंतागुंतीचे कार्य आहे. अनेक गोष्टींचा सुक्ष्म अभ्यास, नैसर्गिक वातावरणाचा, भुप्रदेशाचा तसेच वास्तुमालकाच्या गरजांचा संपूर्ण अभ्यास केल्यानंतरच एखाद्या वास्तुचा आराखडा, ठराविक जागेवर विशिष्ट पद्धतीने बांधण्याचा विचार केला जातो. या प्रक्रियेत एक मूळ संकल्पना असते आणि इतर बारकाव्यांसाठी स्वतंत्र संकल्पना असतात, सर्वसामान्य ज्ञान, अनुभव, आवड आणि आवश्यक तेव्हा योग्य ते कार्य करूनच वास्तुची निर्मीती होत असते. परंतु हे पुरेसे नाही.

‘‘वास्तु - शास्त्रा’’ नुसार सुर्यादी ग्रह, नक्षत्र, पृथ्वी तसेच अनेक उर्जा स्त्रोतांचा वास्तुवर आणि वास्तु उपभोगणार्‍यांवर होणार्‍या इष्ट आणि अनिष्ट परिणामांचा संपूर्ण विचार करूनच इमारत बांधणे श्रेयस्कर आणि अंतीमत: समाज हिताचे असेल.

जिओलॉजी-बायोलॉजी नावाचे नुकतेच अस्तित्वात आलेले शास्त्र आणि त्याचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ यासंबंधी अधिक सखोल अभ्यास करीत आहेत. अशा प्रकारचे संशोधन समाजाचे व्यापक हित लक्षात घेऊनच अनेक क्षेत्रात सुरू आहे. किरलीयन फोटोग्राफी नावाचे शरीरावर होणार्‍या परिणामांचे प्रत्यक्ष पुरावे तपासता येतात. तसेच वेगवेगळ्या वास्तु-शास्त्रीय आणि भौमितीक आकारांचा शरीरावर होणारा उर्जा क्षेत्रीय प्रभाव अभ्यासता येतो.

बी.ई. मॅग्नेटीक - रेझोनन्स डिटेक्टर या यंत्राद्वारे मानवीशरीर, वास्तु आणि वास्तुच्या परिसरातील विविध उर्जा किरणांचा, क्षेत्रांचा, अक्षांचा अभ्यास करून हानीकारक उर्जा किरणांच्या परिणामांना निष्फळ करणे, तसेच उपयोगी आणि फायदेशीर असणार्‍या उर्जा किरणांचा समतोल साधणे शक्य झाले आहे. निरोगी आणि उत्कर्षदायी वास्तु इच्छिणार्‍यांसाठी अशा प्रकारचे उपकरण अकोला येथे आम्ही उपलब्ध करून दिले आहे. उर्जा शुद्ध वास्तुंची निर्मीती ही आजची गरज आहे. परंतु त्यासाठी नवीन वैशिष्ट्यपूर्ण कौशल्याची आवश्यकता असते. सध्याच्या वास्तु-शास्त्रीय अथवा अभियांत्रिकी अभ्यास क्रमातून असे कौशल्य प्राप्त होणं अवघड आहे. प्राचीन भारतीय वास्तु-शास्त्र, ज्योतिविज्ञान तसेच अनेक पारंपारिक शास्त्रे उदा. रंगविज्ञान, रत्नविज्ञान, पातंजल, योगशास्त्र, आयुर्वेद, शिवस्वरोदय विज्ञान आणि या अशा अनेक शास्त्रांमध्ये केलेल्या सूचना व्यक्तींच्या निरोगी आणि उत्कर्षदायी वास्तु निर्मितीसाठी आवश्यक आहेत. याचा सखोल अभ्यास या संदर्भात अत्यंत महत्वपूर्ण आहे.

निसर्ग, वास्तु आणि शरीर या मधील उर्जा संतुलन वास्तु शास्त्राच्या माध्यमातून साधण्याची आपल्या पुर्वजांची ही कला समजून घेणे आणि शिकून त्याचा आजच्या धकाधकीच्या जीवनात वैयक्तिक तसेच व्यापक सामाजिक हितासाठी उपयोग करणे हे वास्तुतज्ञांचे आद्य कर्तव्य ठरते.

Disclaimer | Sitemap

© Copyright 2010, Vaidic Sanskar Architectonics (I) Pvt. Ltd., All Rights Reserved.