Vaidic Sanskar-vastu tadnya,Vastu compliant Home,Vastu compliant Office,vastu consultant,interior vastu way,vastu compliant property,vastu energies,vastu shastra training,ENERGY BASE BRANDING

Grah Dhoop

The Grah Dhoop sticks are made from natural, sustainable planet sources.

Dikpal

Dikpal means a Protector of Direction.


Vaastu Nikshep Manjusha

Indian tradition deals in detail with Vaastu Shanti, a process of energization.

Auspiwatch

This is not just the watch, it is almost the map of the planet movement everyday

Orgone Energy Products

Dr. Wilhel Reich, M. D. of USA is just one of them who named it as 'orgone energy'.

Vaastu Consultancy

Our services include Vaastu Consultancy for Residential, Commercial, Industrial, Residential cum Commercial

Vaastu Solutions

Vastu-compliant-Office
Energy Based Branding

Are you looking out for strategic and scientific solutions for the growth of your business? 'Energy Based Branding' is the answer. Experience to Believe it!

Home >> About us >> Chronological Biodata>> Gawkari 24 Aug 2008

Gawkari 24 Aug 2008

संस्कृती वैभवतर्फे मान्यवरांची व्याख्याने

संस्कृती वैभव आणि कुसुमाग्रज वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. रामनाथशेठ चांडक व्याख्यानमाला मंगळवार दि. २६ ते गुरूवार दि. २८ ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. प. सा. नाटयगृहात सायंकाळी ६ वाजता ही व्याख्याने होतील, असे काल संस्थेचे अध्यक्ष नंदन दिक्षित यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
२६ रोजी चित्रपट व दूरदर्शन मालिकेतील अभिनेत्री डॉ. मानसी मागीकर यांचे ‘अवकाशातील अवकाश’ हा घर या संकल्पनेवर आधारित कार्यक्रम होईल. दि. २७ रोजी पुण्याचे आर्किटेक्ट संजय महाशब्दे यांचे ‘वैदिक संस्कार ते पंचांगाचे सॉफ्टवेअर’ या विषयावर व्याख्यान होईल. दि. २८ रोजी ‘उद्योग साधना - नवी वाटचाल’ या विषयावर सुरू असलेल्या दूरदर्शन मालिकेसंबंधी प्रकत मुलाखत डॉ. प्रदीप वाघ देणार आहेत, अशी महीती संस्थेचे उपाध्यक्ष पी. एस. कुलकर्णी यांनी दिली. ओबीसी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. कैलास कमेद, अपर जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी रमेश काळे, उपजिल्हाधिकारी महेश पाटील आदी प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित रहातील.
या संपूर्ण व्याख्यानमालेला नाशिककर रसिकांनी उपस्थित रहावे, असे अवाहन राधाकिसन चांडक यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेला संस्थेचे जनसंपर्कप्रमुख डॉ. अरविंद पाठक उपस्थित होते. ‘अवकाशातील अवकाश’ हा साहित्य, संगीत आणि अभिनय यांचा एकत्रित आविष्कार असणारा एकपात्री कार्यक्रम डॉ. मानसी मागीकर सादर करणार आहेत. आर्किटेक्ट संजय महाशब्दे यांचा वास्तुरचनेबरोबरच अनेक शास्त्रांचा अभ्यास असून विविध विषयात मौलिक संशोधन त्यांनी केले आहे. आधुनिक सॉफ्टवेअरचा उपयोग करून त्यांनी नेमकी माहीती देणारे पंचांग तयार केले आहे. त्याविषयी विचार द्ययाख्यानात ऐकायला मिळतील. डॉ. प्रदीप वाघ यांनी बाल वयातच विद्यार्थ्यांना उद्योगासंबंधी प्रशिक्षण दिले तर मोठेपणी उद्योजक बनने कसे सहजसाध्य होते, याविषयी संशोधन केले आहे. यासंदर्भात दूरदर्शनवर मालिका सुरू असून त्यात १४ ते १६ या वयोगटातील विद्यार्थांचा सहभाग आहे. या वैशिष्टयपूर्न मालिकेविषयी व ‘उद्योजकता विकास - उद्योग साधना’ याबाबत डॉ. वाघ यांचे विचार ऐकण्याची संधी विद्यार्थी, पालक व जिज्ञासू नागरिकांना लाभणार आहे.
डॉ. प्रदीप वाघ यांचे व्याख्यान इ. आठवी ते दहावीतील विद्यार्थ्यांनी आवर्जून ऐकावे यासाठी शाळांनी व पालकांनी या व्याख्यानात विद्यार्थ्यांना पाठवावे, असे अवहान संयोजकांनी केले आहे. 
{सिन्नर  येथेही डा. राजेगावकर सभागृहात ही व्याख्यानमाला दि. २७ व २८ रोजी होणार आहे. दि. २७ ला डॉ. मानसी मागीकर व २८ रोजी सायंकाळी ६.३० वाजता आर्किटेक्ट संजय महाशब्दे यांचे व्याख्यान होईल.}

Disclaimer | Sitemap

© Copyright 2010, Vaidic Sanskar Architectonics (I) Pvt. Ltd., All Rights Reserved.