Vaidic Sanskar-vastu tadnya,Vastu compliant Home,Vastu compliant Office,vastu consultant,interior vastu way,vastu compliant property,vastu energies,vastu shastra training,ENERGY BASE BRANDING

Grah Dhoop

The Grah Dhoop sticks are made from natural, sustainable planet sources.

Dikpal

Dikpal means a Protector of Direction.


Vaastu Nikshep Manjusha

Indian tradition deals in detail with Vaastu Shanti, a process of energization.

Auspiwatch

This is not just the watch, it is almost the map of the planet movement everyday

Orgone Energy Products

Dr. Wilhel Reich, M. D. of USA is just one of them who named it as 'orgone energy'.

Vaastu Consultancy

Our services include Vaastu Consultancy for Residential, Commercial, Industrial, Residential cum Commercial

Vaastu Solutions

Vastu-compliant-Office
Energy Based Branding

Are you looking out for strategic and scientific solutions for the growth of your business? 'Energy Based Branding' is the answer. Experience to Believe it!

Home >> About us >> Chronological Biodata>> Kesari 11 June 1987

Kesari 11 June 1987

उपेक्षा न जुमानत संस्कृति कोश पूर्ण

पुणे संस्कृति कोशाच्या कामाला आरंभ केला तेंव्हा आपणासारख्या सामान्याची पदोपदी उपेक्षा झाली, ती न जुमानता हे काम करण्यात आपण यशस्वी झालो, असे उद्गार पंडित महादेवशास्त्री जोशी यांनी बुधवारी येथे काढले.
नागपूरच्या छत्रापति सेवा प्रतिष्ठानतर्फे ३१४ व्या शिवराज्याभिषेक स्मृतिप्रित्यार्थ श्री. जोशी यांना विव्दत् गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. येथील टिळक स्मारक मंदिरात हा समारंभ आयोजीत करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्याक्षस्थानी विधान-परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते ग. प्र. प्रधान होते. पत्रकार स. मा. गर्गे प्रमुख पाहुणे होते.
लघुकथा लेखक होण्यासाठी जन्मगाव सोडून आपण पुण्यात आलो, यशस्वी कथा लेखनानंतर पुढे कोशवाडःमयाची गरज वाटून आपण संस्कृतिकोशाच्या कामाला आरंभ केला, असेही श्री. जोशी यांनी सांगीतले.
छत्रापति सेवा प्रतिष्ठानतर्फे १९८२ पासून देण्यात येणा-या या पुरस्कारात १००१ रूपये रोख, शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह यांचा समावेश आहे. आतापर्यंत पाच व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
या प्रसंगी श्री. जोशी यांच्या पत्नी सौ. सुधाताई जोशी यांचाहि प्रतिष्ठानतर्फे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. शिवनेरी स्मारक समितीचे अध्यक्ष बिंदूमाधव जोशी यांनी श्रीमती जोशी यांना समितीच्या वतीने ५०१ रूपये देऊन त्यांचा सत्कार केला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला बाबूराव खळदकर यांचे सनई वादन व शाहिर हिंगे व योगेश यांचे शहिरी अभिवादन झाले. खमलकर तपस्वी यांनी सिवस्तन केले. प्रतिष्ठानचे कार्यवाह विजय देशमुख यांनी प्रास्ताविक केले. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे व्याख्यान झाले. प्रतिष्ठानाचे अध्यक्ष माधव काणे यांनी सर्वांचे स्वागत केले.

मराठयांचा इतिहास
मराठयांच्या इतिहासाचा एकत्रित  समग्र कोश तयार होण्याची गरज श्री. गर्गे यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली श्री. प्रधान आपल्या अध्यक्षीय भाषणत बोलताना म्हणाले की, विव्दत्ता व रसिकता यांचा सुरेख संगम श्री. जोशी यांच्यात झाला आहे. विव्दत्तेची उपासना करताना त्यांचे कलावंताचे मन सतत जागृत राहते. संस्कृतीकोश तयार करताना श्री. जोशी यांना त्यांच्या मुलीने जी अमुल्य मदत केली त्याचा श्री प्रधान यांनी आवर्जून उल्लेख केला.

प्रतिष्ठानचे पुण्यातील कार्यकर्ते प्रताप गेगावले यांनी आभार प्रदर्शन केले. श्री. काणे यांच्या संग्रहातील दुर्मिळ नाण्यांचे प्रर्दशन या वेळी आयोजित करण्यात आले होते. तसेच प्रतिष्ठानाचे कार्यकर्ते संजय महाशब्दे यांनी रायगडवरील राजसभा व मिनार यांच्या वास्तुशास्त्रीय दृष्टिकोनातून रेखाचित्रा व प्रतिकृती तयार केल्या असून त्याही या प्रसंगी पाहण्यासाठी येथे ठेवण्यात आल्या होत्या.

Disclaimer | Sitemap

© Copyright 2010, Vaidic Sanskar Architectonics (I) Pvt. Ltd., All Rights Reserved.