प्राचीन भारतीय वास्तुशास्त्रज्ञ विश्वकर्मा आजचा कुतुबमिनार वराह मिहिरने उभारलेला
व्दारका नगरीचा निर्माता
त्रिलोक निर्मात्या सूत्रधार विश्वकर्म्याचा १८ फेब्रुवारी हा जयंतीदिन नागराज ‘वसुकी’ व त्यांची पत्नी महासती योगसिथ्दा ‘प्रभास’ यांचा हा पुत्र, ‘विश्वकर्मा‘ त्वष्टा किंवा देवशिल्प या नावानेही ओळखला जातो| देवदेवतांची नानाविध अस्त्रे, शस्त्रे, दशाननाची लंका, तसेच यदुकुलश्रेष्ठांची व्दारका नगरी यानेच निर्माण केली. विश्वरूप आणि वृत्र हे दोन पुत्र व सूर्यपत्नी ‘संज्ञा’ ही यांचीच मुलगी असल्याची माहिती मिळते. तसेच भगवान श्रीरामचंद्रासाठी सागर सेतू उभारणारा वानरराज नल, हाही यांचाच पुत्र होता, हे बहुतेकांना ठाऊक नसावे.
शिरपूर जैन येथील विश्वकर्मा मंदीर
पाश्चिमात्य विद्दापीठाच्या पदव्या मिळविणारया किंवा त्यासाठी धडपडणारया आजच्या तरूण भारतीय तंत्रज्ञांना, अभियंत्यांना ‘विश्वकर्मा‘ आणि त्यांच्या कार्याची थोडक्यात ओळख करून देणं आवश्यक वाटतं. त्या दृष्टीने एक प्रयत्न. अत्यंत दुर्मिळ असे ‘विश्वकर्मा मंदिर’ अकोला जिल्हयात ‘शिरपूर जैन’ या गावी असून, विश्वकर्मा जयंती निमित्त येथे एक भव्य यात्रा दरवर्षी भरते; याची वाचकांना काल्पना असेलच.
प्राचीन हिंदूंची विमाने, प्राचीन भारतातील यांत्रिक व तांत्रिक ज्ञान तसेच आमच्या पूर्वजांचे वेद, विज्ञान, हे विषय कडव्या धर्मनिष्ठांसाठी कितीही जिव्हाळयाचे असले, तरीही आजचे बहुसंख्या ‘विज्ञाननिष्ठ’ (निष्ठाहीन वैज्ञानिक) मात्र या विषयाकडे उपहासात्मक नजरेने बघतात, दुर्लक्ष करतात| खंर तर ‘दुर्लक्ष’ हे विज्ञानाचं दुर्देव आहे.
प्रकाशवेगाचे मापन
एरवी दृष्य-अदृष्यांची प्रमाणिक चिकित्सा हाच वैज्ञानिकांचा गुण नव्हे, ते विज्ञानाविषयीचे उगमस्थान आहे.
आनादी काळापासून आमच्या पूर्वजांनी जिवापाड जपलेली एकच एक गोष्ट म्हणजे वैदिक तत्वज्ञान व वेद वङमय| साधारणपणे ५०० वर्षापूर्वी वेदांवर भाष्य लिहणाऱ्या या सायनाचार्यांनी ऋग्वेद १-५०-४ या ऋचेचा अर्थ (तसाच स्मयर्ते योजन्तांन सहस्रे द्वे द्वे शते द्वे च योजने एकेव निमिषार्धेन क्रममाण नमो स्तुते ) अर्थात सूर्यप्रकाश निमिषार्धात दोन सहस्त्र दोनशे दोन योजने आक्रमितो, असा दिलेला आह. एक निमिष म्हणजे १६/७५ सेकंद. एक योजन म्हणजे ९.०९ मैल.
म्हणून ऋग्वेदाप्रमाणे सूर्यप्रकाशाचा वेग १,८७,६७० मैल प्रत्येक सेकंदाला इतका येतो; तर आधुनिक शास्त्रीय प्रयोगांच्या निष्कर्षानुसार, दर सेकंदाला प्रकाशाचा वेग १,८६,२९५ मैल इतका आहे.
सितामाईच्या शोधार्थ आपले वानरसैन्य चारही दिशांना पाठवताना वानर राज सुग्रीव सांगतो की, क्षीरसागर पार केल्यानंतर एका पर्वतावर तीन शाखांनी चमचमणारा सोनेरी तालवृक्ष पूर्वदिशेची खूण म्हणून स्थापन केलेला आहे.
हे त्रिशूळी वृक्षदंड आजही पेरू देशात पॅसिफिक समुद्र पार केल्यानंतर ऍन्डीज पर्वताजवळील एका टेकडीवर जमिनीत खोल खड्डा करून कोरलेला आहे. संपूर्ण पिवळया फॉस्फरसचा हा त्रिशूळ फक्त रात्री अवकाशातूनच स्पष्टपणे जाणवतो. अनेक वैमानिक व विद्वानांच्या मते पूर्वी विमान चालकांना दिशाज्ञान होण्यासाठी हा तयार केला असावा| वामनावतारात भगवान श्रीविष्णूंनी पूर्व दिशा स्थिर केली ती याच सांकेतीक चिन्हाने तर नव्हे?
प्राचिन काळातील हिंदुंच्या वैज्ञानिक प्रगतीचे पुरावे गोळा करण्यासाठी, ऋग्वेद किंवा रामायण काळ धुंडाळण्याचीही गरज नाही.
वराह मिहीरचे कार्य
शकप्रवर्तक महाराजा विक्रमदित्याच्या राज्यात विश्ववंदनीय ज्योतिर्विज्ञानाचार्य भारतविभूती वराहमिहिर यांनी सूर्यादी ग्रहांचा वेध, त्यांची गती, यांच्या निरीक्षणासाठी एक तलाव, २७ नक्षत्र भवन व एक प्रचंड स्तंभ उभारला| वर्तमान कालनिर्णय पध्दतीप्रमाणे २१ जून हा उत्तरायण काळातील शेवटचा दिवस| या दिवशी सूर्य हा पूर्व - पश्चिम रेषेपासून जास्तीत जास्त उत्तरेकडे असतो| वरमिहिर यांनी बांधलेल्या वेधशाळेतील या प्रचंड स्तंभाची २१ जून रोजी दुपारी पृथ्वीवर कुठेही छाया पडणार नाही आशी व्यवस्था केली. २१ जून पासून ते २३ डिसेंबरपर्यंत हळुहळू वाढत जाणारी जमिनीवरची त्या स्तंभाची छाया भोवती बांधलेल्या नक्षत्र भवनांशी संबंधीत होती| तसेच रात्री त्याच स्तंभाची बाजूच्या तलावात पडणारी चंद्रछाया, राशी नक्षत्रांची संपूर्ण शास्त्रीय उकल करून दाखवीत असे. या संदर्भातील छायाचित्रे सहारनपूरच्या भारतीय ज्योतिर्विज्ञान अनुसंधान संस्थेने प्रसिद्ध केलेली आहेत.
हे संपूर्ण वर्णन ज्या प्रचंड स्तंभाचे आहे, तो स्तंभ म्हणजे ‘कतुबमिनार’. राजधनी दिल्ली येथील हा प्रसिद्ध कुतुबमिनार ५ अंश, १ कला आणि २८ विकला इतक्या कोनात दक्षिणेकडे कलता (झुकलेला) बांधला आहे, दिल्लीचे अक्षांश २८ अंश, ३१ कला २८ विकला उत्तरेस आहे. २१ जून रोजी सूर्य मध्यरेषेपासून २३ अंश ३० कला उत्तरेस असतो. म्हणूनच २८ अंश, ३१ कला २८ विकला आणि २३ अंश, ३० कला या दोनमधील अंतर ५ अंश, १ कला २८ विकला इतका कोन दक्षिणेकडे ठेवून कुतुबमिनार बांधला आहे.
पाया कमकुवत झाल्याने कुतुबमीनार कलला, हे विधान खोटे आहे. नव्हे, ती एक सरकारी पळवाट आहे. कमकुवत पाया झाल्याने दक्षिणेकडेच आणि तोही अचूक ५ अंश, १ कला २८ विकला इतक्या कोनात कुतुबमिनार कसा काय झुकला? ते तपासून बघायला हवे. वैज्ञानिक प्रगतीमुळे स्वयं पाकघरातील शेगड्या, चुली जाऊन स्टोव्ह, गॅस आले, आता तर सर्वत्र सौर चुली सर्रास वापरत आहेत. परंतु स्वयंपाकघरातील ओट्यावर सौर चुलीसाठी आवश्यक असलेले प्रखर सूर्यकिरण आपल्याला आणता येत नाहीत. म्हणून सौर चुली घेऊन रणरणत्या उन्हात गृहिणींना वणवण भटकावे लागते.
आजच्या प्रगत युगातील विज्ञान वास्तुशास्त्रज्ञांची ही हार नव्हे काय?
या पर्श्वभूमीवर मंदिराच्या अंधार्या गर्भगृहातील देवतेच्या मूर्तीवर ठराविक ठिकाणी ठराविक वेळी रोज सूर्यकिरण पडतील, अशी व्यवस्था करणार्या प्राचीन भारतातील अप्रसिद्ध वासतुशिल्पाच्या कार्याची ओळख करून घेणे आवश्यक आहे. हाय टेन्शन टॉर्क स्टील बार्स, ग्रेड वन एल ऍन्ड टी सिमेंट, प्रिस्टेस्ड कॉन्क़्रीट आणि अनेक देशी परदेशी तंत्रज्ञांच्या देखरेखीखाली तयार केलेला मुंबई शहराला, नव्या मुंबईशी जोडणारा ठाणे खाडी पूज, तप अर्ध तपाच्या आतच सुस्कारे टाकतोय. इतके की, दर शनिवार-रविवार पुलावरील वाहतूक थांबवून दुरूस्तीकरण सुरू असते.
सिंधुदुर्गाचे भक्कम बांधकाम
जवळपास ३२० वर्षापूर्वी उभारलेला सिंधुदुर्ग सिंधुसागराच्या प्रचंड लाटांशी नित्यनेमाने लढत असूनही जसाच्या तसा कणखरपणे उभा आहे. क्वचीत कुठे लाटांच्या माराने दगड झिजले असतील, तर दोन दगडामधील चुना ६ इंच बाहेर डोकावतो आहे.
खाडीतील संथ पाण्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाने उभारलेला पूज ढासळतो आहे आणि खळाळणार्या सागर लाटांमध्ये बांधलेल्या दुर्गावर दगड झिजूनही चुना तसाच आहे.
हे सगळं वाचून-ऐकून आपण आपला देश वैज्ञानिक प्रगतिसंदर्भात प्राचीन काळी मागासलेला होता असं म्हणणं पोरकटपणाचं वाटतं नाही का? गेल्या दशकात महाराष्ट्रात राजधानी मुंबापुरीत फिलिप्स जॉन्सन नावाच्या अमेरिकन वास्तुशास्त्राने नॅशनल सेन्टर फॉर परफॉर्मिग आर्टस हे प्रेक्षागृह (थिएटर) बांधून चमत्कार घडविला . १०१० लोकांची बसण्याची व्यवस्था असलेल्या या थिएटरमध्ये वक्याचा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कुठलीही यंत्रणा, (ध्वनि क्षेपक वगैरे) नाही.
भारतातील अशाप्रकारचे हे एकमेव असे प्रेक्षागृह आहे. परंतु शिवछत्रपतींच्या राजधानी रायगडावर राजदरबारात आजही ६००० लोक बसण्याची व्यवस्था आहे आणि केवळ वक्ताच प्रेक्षकांपैकी बोलू शकतो असे नाही, तर प्रेक्षकांपैकी कुणीही बोलला तर वक्त्याला ते स्पष्टपणे ऐकू येण्याची इथे योजना केली आहे, सुदैवाने आजही फारशी पडझड न झालेली रायगडावरील ही वास्तु व त्याची बांधणी बघता येते हे आमचं भाग्य.
येत्या २५ वर्षात दुर्दैवाने याची पडझड झाली, तर ध्वनिक्षेपकाशिवाय इतका मोठा ६००० प्रेक्षकांसाठीचा हा दरबार दंतकथेत मोडकळीस टाकला जाईल.
हे व असे अनेक चमत्कार आमच्या पूर्वजांनी घडविलेले आहेत. काही आजही अनुभवता येतात. अनेक धुळीस मिळालेत, मिळवले गेलेत. या संदर्भात अनेक संस्कृत ग्रंथ उपलब्ध आहेत. ज्यावरून आजही ही सगळी शास्त्रे पुन्हा नित्योपयोगात आणता येतील.
विश्वकर्मा वास्तुशास्त्र, नारदशिल्प शास्त्रम्, वास्तुशास्त्रोपनिषद, समरांगण सूत्रधार, मयतम्, बृहतविमानशास्त असे अनेक ग्रंथ आहेत.
विश्वकर्मा
हे सगळे ग्रंथ संस्कृत भाषेत आहेत. आजचे विज्ञाननिष्ठ संस्कृत जाणत नाहीत व संस्कृत विद्वान शास्त्र जाणत नाहीत.
आणि हे संस्कृत पंडित व तरूण वैज्ञानिक एका व्यासपिठावर येत नाहीत ही खरी खंत आहे.
पुण्यस्मरण
बरत १८ फेब्रुवारी विश्वकर्मा जयंतीनिमित्त, यंत्र-तंत्र जगताचे सूत्रधार विश्वकर्मा यांचे पुण्यस्मरण करून वैज्ञानिक व पंडितांनी एकत्र येऊन या क्षेत्रात कार्य करावे असे आवाहन करतो. या क्षेत्रात अनेक व्यक्ति वैयक्तिक पातळीवर कार्य करीत आहेत. त्यांना यशप्राप्ती व्हावी यासाठी प्रार्थना करतो. (या विषयाची आवड अथवा अभ्यास असणार्यांनी लेखकांशी अवश्य संपर्क साधावा.)
कंब सुत्रं अंबु पावं सहिते करतले पूस्तकं ज्ञानसूत्रं |
हंसारूढं त्रिनेत्र: शुभ्रमुकुटशिर: सर्व तो वृद्ध काया॥
त्रेलोक्यं येन सृष्टं सकल सूरग्रंहे राजहम्यां दि हम्यां |
देवा सो सुधारो जगतं खिल हित: पातू वो विश्वकर्मा ॥
ओळंबा वा पाण्याचं भाडं यासहित तळहातावर ज्ञानसूत्रांच पुस्तक घेतलेला, हंसारूढ झालेला, त्रिनेत्र असलेला (त्रिमिति जाणणारा) शिरावर शुभ्र मुकुट आणि संपूर्ण कायेवरती वृद्धत्वाची चिन्हे असलेला त्रिलोक, ज्याने निर्माण केली, सर्व देवांची गृहे, वाडे, राजवाडे, प्रासाद ज्याने निर्माण केले तो साक्षात सूत्रधार सर्व जगताच कल्याण करण्याकरिता,
हे ‘विश्वकर्मा’ तू आमचे रक्षण कर. यिती॥