नागपूरकर पुण्यात आले हाच माझा खरा सत्कार
                    पुणे दि. १० (प्रतिनिधी) माझ्या ज्ञानाचा   गौरव     नागपूरकरांनी पुण्यामध्ये केला, हाच माझा खरा सत्कार होय असे पं.       महादेवशास्त्री जोशी यांनी बुधवारी येथे सांगितले.
				    नागपूर येथील छत्रपती सेवा प्रतिष्ठानतर्फे   येथील     ट़िळक स्मारक मंदिरात पं. जोशी यांना माजी आमदार प्रा.ग.प.   प्रधान यांच्या     हस्ते जिजामाता विद्वत-गौरव पुरस्कार प्रदान करण्यात   आला. यावेळी जोशी     यांना जिजामातेचे स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ व १००१   रू. देण्यात आले.
				      मनाचा मोठेपणा हा खरा विदर्भाकडेच आहे, असे सांगून श्री.   जोशी म्हणाले     की, खरं तर यासाठी मी नागपूरला जायला हवे होते. पण   प्रकृतीमुळे मला जाता     आले नाही. म्हणून नागपूरकरच पुण्याला आले.
				      गोव्याहून पुण्याला भारतीय संस्कृतीचा कोष निर्माण   करण्यासाठी आलो     नव्हतो. लघुकथा लेखक होण्यासाठी माझी फार इच्छा होती.   पण गोव्यातील वातावरण     त्याला पोषक नव्हते. म्हणून इकडे आलो. पुण्यात   अत्यंत कष्टात दिवस   काढले.   पण ते कथा लेखनापूर्वी १५ वर्षात एकूण १५०   लघुकथा लिहिल्या.   त्याला   बक्षिसेही मिळाली. त्यात वैशिष्ट्य म्हणजे   संस्कृत लघुकथाही   लिहिल्या पैकी   एका कथेला अ.भा संस्कृत कथा स्पर्धेत   दुसरे बक्षिस मिळाले.   तीच कथा नागपूर   विद्यापीठ प्रकाशित करीत आहे   असेही श्री. जोशी म्हणाले.
				    
कार्य अपुरे नाही
मी मानवी मूल्ये कथेतून मांडली असे सांगून   पं. जोशी     म्हणाले की, यानंतर भारतीय संस्कृती कोषाकडे मी वळलो. त्यातून   प्रथम     संस्कृती कोष व वैदिक वाङमयाचा अभ्यास केला व नंतर लोक   संस्कृतीचा अभ्यास     केला. तसेच लोक संस्कृती मोठ्या प्रमाणावर जनतेसमोर   मांडली. माझे     महाराष्ट्रातील कोष कार्य अपुरे राहिले नाही हे माझे   सुदैवच होय, असेही पं.     जोशी म्हणाले.
				    
                        वाखाणण्याजोगी ज्ञानलालसा
अध्यक्षपदावरून बोलताना प्रा. प्रधान म्हणाले   की,     जीवनातील शाश्वक्त गोष्ट   म्हणजे ज्ञानोपासना. ही गोष्ट जेथे मला   दिसते     तेथे मी नतमस्तक होतो. तीच   संधी आज मला लाभली आहे. पं. जोशी   यांनी वैदिक     वाङमयाचा अभ्यास केला असला   तरीपण त्यांनी सामान्य   माणसांकडेही लक्ष   दिले   आहे. या वयातही त्यांची   ज्ञानलालसा खरोखरीच   गौरवास्पद आहे. यावेळी     प्रा.प्रधान यांनी छत्रपतींच्या   जीवनातील काही   प्रसंग सांगितले.
				      श्री. सन.मा.गर्गे म्हणाले की,   मराठ्यांच्या इतिहासाचा   कोष प्रकल्प   तयार   करण्याची आज नितांत आवश्यकता आहे.   तसेच त्यामध्ये   सर्व घडलेल्या   घटनांची   नोंद होणेही आवश्यक आहे. त्यामुळे   अन्य ग्रंथ न   चाळताही एकाच   ठिकाणी सर्व   प्रकारची माहिती उपलब्ध होऊ शकेल.   आजच्या   काळात हे आव्हान   आहे. हे काम   जर झाले तर शिवस्मरणाचा हा एक भाग होऊ     शकेल, असेही ते   म्हणाले.
				    योग्य पद्धतीने जपणूक
				    पूर्व युरोपातील दौर्यातील एक प्रसंग   सांगताना     श्री. गर्गे म्हणाले की, लेलिनग्राडला असणार्या वस्तू   संग्रहालयात गेलो     असताना तेथे छत्रपतींच्या काळातील तलवारी, खंजिर   इत्यादी गोष्टी पहावयास     मिळाल्या. अतिशय येग्य पद्धतीने या वस्तूंची   जपणूक केली आहे. याचप्रकारे     महाराष्ट्राच्या विविध भागात सापडणार्या   इतिहासकालीन वस्तू, शिलालेख,     पत्रे याची आपण जपणूक केली पाहिजे. यावेळी   त्यांनी आपल्या भाषणात पं. जोशी     यांच्या कार्याचा गौरव केला.
				      छत्रपती शिवाजीमहाराजांचे जीवन हा एक राष्ट्रीय प्रकल्प   व्हावा. असे     सांगून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आपल्या भाषणात म्हणाले   की आज     छत्रपतींच्या जीवनाचा अभ्यास करण्यासाठी परदेशातील अभ्यासक्रम   भारतात येत     आहेत. पण आम्ही मात्र शिवरायांच्या जीवनाचा म्हणावा तसा   परिपूर्ण     अभ्यासकरीत नाही. वास्तविक शिवाजीमहाराजंाच्या चरित्राचा   अभ्यास होण्याची   नितांत आवश्यकता आहे.
				      शिवाजीमहाराज केवळ महाराष्ट्रापुरतेच मर्यादित नव्हते तर   सार्या     देशासाठी त्यांनी कार्य केले हे त्यांच्या जीवन कार्यावरून   दिसून येते.     यावेळी श्री. पुरंदरे यांनी परदेशातील अनुभवांची व तेथे   सापडलेल्या विविध     ऐतिहासिक वस्तूंबाबत माहिती दिली.
				    तब्बल एक तपानंतर
प्रतिष्ठानचे कार्यवाह व शिवकथाकार विजयराव   देशमुख     यंनी प्रास्ताविकामध्ये प्रतिष्ठानच्या कार्याची सविस्तर माहिती   दिली. ते     म्हणाले की, आज महाराजांच्या ३१४ व्या श्रीशिवराज्याभिषेक     स्मृतिप्रित्यर्थ   हे विद्क्त पुरस्कार देण्यात आले. यापूर्वी हा समारंभ     नागपूरला होत असे.   तब्बल १२ वर्षानंतर हा कार्यक्रम पुण्यात होत असे.     राज्यरोहणाचा उत्सव हा   आमचा स्वातंत्रदिन. एक पवित्र दिवस. आज विद्वान न     कळत लाचार होत आहेत. शासन   व समाजही अशा विद्वानांची हेळसांड करते. पण     समाजाने यातून मार्ग काढला   पाहिजे, असेही ते म्हणाले.
				      प्रारंभी श्री. बाबूराव खळदकर यांच्या सनई वादनानंतर शाहीर   हिंगे व     मंडळींनी स्वा. सावरकरांचा पोवाडा म्हटला. शाहीर योगेश यांनी   ये     राष्ट्रपुरूष शिवराया था हे गद्यकाव्य म्हटले श्री. कमलाकर तपस्वी   यांनी     शिवस्तवन व महाराष्ट्र गीत म्टले. श्री. प्रताप गोगावले यांनी   आभार मानले.     श्री. विजयराव देशपांडे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.
				    दुर्मिळ नाण्यांचे प्रदर्शन
कार्यक्रमाच्या निमित्ताने टि. स्मा.   मंदिरामध्ये     सकाळपासून रात्रीपर्यत प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. माधवराव   काणे यांचे     दुर्मिळ नाण्यांचे प्रदर्शन व श्री. संजय महाशब्दे यांच्या   किल्ले     रायगडांवरील रेखाचित्राचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
				      या समारंभात श्री. शिवनेरी स्मारक समितीतर्फे श्री.   बिंदूमाधव जोशी यांनी श्रीमती सुधा जोशी यांना ५०१ रू. देऊन मातृपूजा केली