वैश्विक कीरण आणि वास्तू-शास्त्र
एक जुलै हा दिवस दरवर्षी "जागतिक वास्तुकला दिन" म्हणून जगभर वास्तुकलेच्या उपासकांतर्फे साजरा केला जातो. या निमित्ताने वास्तुकलेच्या प्रचलित प्रवाहाकडुन प्राचीन वास्तुकलेच्या एका अत्यंत वैशिष्ट्यापूर्ण दृष्टिकोनातून बघण्याचा प्रयत्न करणे प्रसंगोचित ठरेल.
मनुष्याला तो रहात असलेल्या अथवा राहणार असलेल्या घरामध्ये, सूर्यादी ग्रंहांच्या वैश्विक किरणांचा, पृथ्वीच्या भू-विद्युत चुंबकीय किरणांचा तसेच विविध उर्जाकिरणांचा जास्तीत जास्त फायदा आणि उपयोग व्हावा, शारीरिक , मानसिक आणि पर्यायाने अध्यात्मिक दृष्ट्या हानीकारक परिणाम टाळता यावेत, या हेतूने वास्तु-शास्त्र अस्तित्वात आले.
आपल्या आसपास अनेक घटना घडत असतात, वेगवान वारे वहात असतात, रस्त्यांवर विविध वाहने फिरत असतात आणि आपल्या शरीरातही अनेक घटना घडत असतात. ही अक्षरे वाचताना आपले डोळे हलत असतात. तसेच शरीरात रक्त प्रवाह देखील सुरू असतो. या सर्व घटना उर्जेमुळे घडत असतात. निसर्गात सर्वत्र उर्जा भरून आहे. आणि केवळ उर्जेमुळे संपूर्ण पृथ्वीवर आणि ब्रह्मांडात सर्वत्र अनेक प्रकारच्या घटना सतत घडत असतात. उर्जेमुळेची जीवन चक्र सुरू आहे. पृथ्वीवरील लहानात लहान जिवाणूंपासून मोठ्यात मोठ्या देवमाशापर्यंत आणि सगळ्यात उंच वृक्षापर्यंत उर्जेचे अस्तित्व भरून राहिलेले आहे. रासायिनिक, विद्युत, यांत्रिक, औष्णिक, चुंबकीय, विद्युत-चुंबकीय असे उर्जेचे अनेक प्रकार आहेत.
अस्तित्वात असलेला प्रत्येक पदार्थ हा सूक्ष्म किरणांचा बनलेला असतो. हे कण अणूंचे बनलेले असतात. अणुकेंद्राभोवती हे विद्युत भारित परमाणू सतत भ्रमण करीत असतात. आणि भ्रमण करणारे विद्युत भारित परिमाणू सतत ऊर्जा प्रारणे बाहेर प्रसारित करीत असतात, म्हणूनच अस्तित्वात असलेला प्रत्येक पदार्थ वेगवेगळ्या नैसर्गिक फ्रिक्वेंसीजची ऊर्जा सतत बाहेर टाकत असतो.
प्रकाश अर्थात डोळ्यांना जाणवणारा प्रकाश म्हणजेच विद्युत चुंबकीय ऊर्जा लहरींच्या अस्तित्वांची प्रत्यक्ष पुरावाच होय. डोळ्यांना जाणवणारा हा प्रकाश विद्युत चुंबकीय उर्जा लहरींच्या अनेक प्रकारांपैकी ठराविक भाग होय. प्रकाशाचा रंग हा त्याच्या वेव्ह-लेन्थ वर अवलंबून असतो. साधारणपणे वेव्ह-लेन्थ मोजण्याचे प्रमाणे म्हणजे ऍगस्ट्रॉम युनिट आहे. एक ऍगस्ट्रॉम म्हणजे एक सेंटीमिटरचा एक शंभर दशलक्षांशावा भाग होय. डोळ्याला दिसणार्या प्रकाशाची वेगवेगळ्या रंगाची वेव्ह-लेन्थ ३००० ते ७२०० ऍगस्ट्रॉम इतकी असते, जर प्रकाशकिरणांची वेव्ह-लेग्थ या मार्यादेपेक्षा कमी अथवा जास्त असेल तर अशी किरणे डोळ्यांनी दिसत नाहीत. यापैकी अल्ट्रा-व्हायोलेट, एक्स-रेज, गॅमा-रेज, तसचे इन्फा रेंड, मायक्रो-वेव्ह आणि रेडिओ वेव्ह हे आहेत. यापैकी काहींची वेव्ह-लेन्थ अनेक किलो मीटर्सदेखील असते, यासर्व डोळ्यांना जाणवणार्या अथवा न जाणवणार्या विद्युत-चुंबकीय ऊर्जा किरणांची फ्रिक्वेंसी वेगवेगळी असली तरीही त्यांचा वेग मात्र एक सारखाच ३०००० कि.मी / सेकंद हवेत तसाच आवकाशातही असतो.
मानवी शरीरातही निरोगी आणि रोगी अवस्था याचा संबंध प्रत्यक्ष मानवी शरीरातील उर्जेशीच आहे. केवळ शरीरातील उर्जा क्षेत्रातील ऐक्य/तोल बिघडल्यास किंवा उर्जा अक्ष असंतुलीत झाल्यासच वेगवेगळे रोग निर्माण होतात.
मानवी शरीराप्रमाणे प्रत्येक वस्तु, प्राणी, वनस्पती, पदार्थ आणि आकार यांचे स्वतंत्र असे उर्जा क्षेत्र, उर्जा किरणांचे जाळे तसचे उर्जा अक्ष असतात.आणि त्यांची स्वत:ची अशी नैसर्गिक फ्रिक्वेंसी आणि वेव्ह-लेन्थही असते. भौतिकशास्त्रातील नियमांप्रमाणे २७३ या तपमानाखेरीज इतर कोणत्याही तपमानात जगातील प्रत्येक वस्तु किरणांच्या स्वरूपात उर्जा प्रसारित करीत असतात.
पृथ्वीवरील वेगवेगळ्या उर्जा किरणांचा दिशांशी मानवी शरीरातील उर्जा अक्षांशी असलेला परस्पर गूढ संबंध प्राचीन वास्तु-शास्त्राच्या अनेक तत्वांमध्ये तसेच प्रत्येक इतारतींमध्ये आश्चर्यकारकतेने तंतोतंत पाळलेला दिसतो. याचा इमारतींचा उपयोग करणार्या माणसांच्या आरोग्य तसेच उत्कर्षाशी घनिष्ट संबंध असल्याचे सिद्ध झाले आहे.
१९७० च्या दशकात जर्मनीतील डॉ. हर्टमन यांनी स्वनिर्मिती लोब-ऍन्टेना नाबाच्या उपकरणाच्या सहाय्याने संपूर्ण पृथ्वीवर पसरलेल्या उत्तर-दक्षिण प्रत्येक दोन मीटर अंतरावरील आणि पूर्व-पश्चिम प्रत्येक अडीच मिटर अंतरावरील उर्जा किरण रेखांची माहिती जगाला करून दिली. यासंबंधी गेल्या दोन दशकात झालेल्या संशोधनाप्रमाणे अशा एकूण २० प्रकारच्या उर्जा रेषा पृथ्वीभर पसरली असल्याची माहिती देखील उपलब्ध झाली आहे.
सर्व सजीव प्राणी पृथ्वीवरील या अदृश्य भिंतीची योग्य ती दखल घेत असल्यांची आश्चर्यकारक नोंद देखील शास्त्रज्ञांनी केलेली आहे. मुंग्यांची वारूळ देखील निगेटिव्ह उर्जा केंद्रांवर निदर्शनास आली आहेत. मांजर अत्यंत निगेटिव्ह उर्जा केंद्रावर विसावतांना आढळली आहे, हे सर्व उर्जा बिंदू माणसास हानिकारक असल्याचे माहिती आहे. किंबहुना कुत्रा, गाय, शेळी, घोडा हे प्राणी ज्या जागी स्वत:हून वास्तव्य करतात, त्याजागा न्युट्रल अथवा पॉझिटिव्ह असल्यास तसेच माणसांसाठी राहण्यायोग्य असल्याचे आढळले आहे.चीन या देशातील प्राचीन वैद्यक शास्त्रज्ञांनी शरीरातील रक्तवाहिन्या, धमक्या, मज्जातंतू वगैरेमध्ये फारसा फरक केलेला आढळत नाही. त्यांनी त्याचे लक्ष प्रामुख्याने शरीरातील ऊर्जा स्रोतावर केंद्रित केले, ज्याच्या आधारावर आणि त्यांच्यातील परस्पर संबंधामुळे स्वास्थ रक्षण तसेच प्रमुख कार्य घडत होती. याच धर्तीवर प्राचीन वास्तुशिल्पकाराने वास्तु-शास्त्रात देखील एक कुटुंबासाठी सुचविलेल्या वास्तुरचानेत वेगवेगळ्या दिशांना निरनिराळी कार्ये ठरवून दिली होती आणि अनेक वास्तु एकत्र बांधतांना पाळावयाची बंधने अत्यंत विस्तृतपणे लिहून ठेवली आहे. वास्तुरचना करणे हे अतिशय किचकट आणि गुंतागुंतीचे कार्य आहे. अनेक गोष्टींचा सूक्ष्म अभ्यास, नैसर्गिक वातावरणाचा, भूप्रदेशाचा तसेच वास्तुमालकाच्या गरजांचा संपूर्ण अभ्यास केल्यानंतरच एखाद्या वास्तुचा आराखडा, ठराविक जागेवर विशिष्ट पद्धतीने बांधण्याचा विचार केला जातो. या प्रक्रियेत एक मूळ संकल्पना असते आणि इतर बारकाव्यासाठी स्वतंत्र संकल्पना असतात, सर्वसामान्य ज्ञान, अनुभव, आवड आणि आवश्यक तेव्हा योग्य ते कार्य करूनच वस्तुची निर्मिती होत असते. परंतु हे पुरेसे नाही. वास्तु शास्त्रा नुसार सूर्यादी ग्रह, नक्षत्र, पृथ्वी तसेच अनेक ऊर्जा स्रोतांचा वास्तुवर आणि वास्तु उपभोगण्यांवर होणार्या इष्ट आणि अनिष्ट परिणामांचा संपूर्ण विचार करूनच इमारत बांधणे श्रेयस्कर आणि अंतिमत: समाज हिताचे असेल.
जिओ-बॉयलॉजी नावाचे नुकतेच अस्तित्वात आलेले शास्त्र आणि त्याचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ यासंबंधी अधिक सखोल अभ्यास करीत आहेत. अशाप्रकारचे संशोधन समाजाचे व्यापक हित लक्षात घेऊनच अनेक क्षेत्रात सुरू आहे. किरलीयन फोटोग्राफी नावाचे नविन तंत्र परदेशात विकसित झाले आहे. ज्या माध्यमातून निरनिराळ्या उर्जा किरणांचा शरीरांवर होणार्या परिणामांचे प्रत्यक्ष पुरावे तपासता येतात. तसेच वेगवेगळ्या वास्तु-शास्त्रीय आणि भौमितिक आकारांचा शरीरावर होणारा ऊर्जा क्षेत्रीय प्रभाव अभ्यासाता येतो.
बी.ई. मॅग्नेटिक-रेझोनन्स डिटेक्टर या यंत्राद्वारे मानवीशरीर, वास्तु आणि वास्तुच्या परिसरातील विविध उर्जा किरणांचा क्षेत्रांचा अक्षांचा अभ्यास करून हानिकारक उर्जा किरणांच्या परिणामांना निष्फळ करणे, तसेच उपयोगी आणि फायदेशीर असणार्या उर्जा किरणांच्या समतोल साधणे शक्य झाले आहे. निरोगी आणि उत्कर्षदायी वास्तु इच्छिणार्यांसाठी अशा प्रकारचे उपकरण अकोला येथे आम्ही उपलब्ध करून दिले आहे.
उर्जा शुद्ध वास्तुंची निर्मिती ही आजची गरज आहे. परंतु त्यासाठी नवीन वैशिष्ट्यपूर्ण कौशल्याची आवश्यकता असते. सध्याच्या वास्तु-शास्त्रीय अथवा अभियांत्रिकी अभ्यासक्रमातून असे कौशल्यप्राप्तं होणे अवघड आहे. प्राचीन भारतीय वास्तु-शास्त्र, ज्योतिर्विज्ञान तसेच अनेक पारंपारिक शास्त्रे उदा. रंगविज्ञान, रत्नविज्ञान, पातंजल, योगशास्त्र, आयुर्वेद, शिवस्वरोदय विज्ञान आणि या अशा अनेक शास्त्रांमध्ये केलेल्या सूचना व्यक्तीच्या निरोगी आणि उत्कर्षदायी वास्तु निर्मितीसाठी आवश्यक आहेत. याचा सखोल अभ्यास या संदर्भात अत्यंत महत्वपूर्ण आहे.
निसर्ग, वास्तु आणि शरीर यामधील उर्जा संतुलन वास्तुशास्त्राच्या माध्यमातून साधण्याची आपल्या पूर्वजांची ही कला समजून घेणे आणि शिकून त्याचा आजच्या धकाधकीच्या जीवनात वैयक्तिक तसेच व्यापक सामाजिक हितासाठी उपयोग करणे हे वास्तुतज्ज्ञांचे आद्य कर्तव्य ठरते. जागतिक वास्तुकला दिनानिमित्ताने सुबुद्ध नागरिक आणि विद्वाने वास्तु शिल्पकारांनी आपल्या पूर्वजांच्या या पारंपारिक ज्ञान खजिन्याची योग्य ती दखल घ्यावी आणि तदनुषंगाने वास्तुनिर्मिती करावी.
"सर्वे अपि सुखिन: सन्तु"............